आपले लोकवाङमय गृहाचे मासिक मुखपत्र
आपले वाङमय वृत्त

‘आपले वाङमय वृत्त’ हे ‘लोकवाङमय गृहा’चे मासिक मुखपत्र गेली आठ वर्षे नियमितपणे प्रकाशित होत आहे. मात्र ‘केवळ एखाद्या प्रकाशन संस्थेचे मुखपत्र’ असे या मासिकाचे स्वरूप नाही. एकूणच वाचनसंस्कृतीचा प्रसार व गुणात्मक विकास व्हावा हा ‘आपले वाङमय वृत्त’च्या प्रकाशनामागचा उद्देश आहे. ‘आपले वाङमय वृत्त’मधूम प्रत्येक अंकात महाराष्ट्रातील नव्या उमेदीच्या कवींच्या कविता प्रकाशित होत असतात. मराठीतील आणि इतर भाषांतील वेधक, वेचक मजकूर वाचनासाठी सुचवला जातो. कलाविषयक माहितीपूर्ण लेख आणि वैशिष्ट्यपूर्ण मुखपृष्ठे यांमुळे ‘वाङमयवृत्ता’ने साहित्य विश्वात आपले स्थान निर्माण केले आहे.
या सोळा पानी अंकाची वार्षिक वर्गणी फक्त ६० रुपये आहे.
या संदर्भात अधिक माहितीसाठी  ‘लोकवाङमय गृही’शी संपर्क साधावा. किंवा lokvangmayagriha@gmail.com / lokvangmaya@gmail.com या र्इ-मेलवर मेल करावा.
     
January 2012
February 2012
 
December 2011
November 2011
October 2011
September 2011
August 2011
 

 

Lokvangmaya Griha, Prabhadevi, Mumbai - 400 025 / All Rights Reserved(2012)